Rail  sakal
अहिल्यानगर

नगर-परळी रेल्वे यार्डातच

अहमदनगर स्थानकात तीन महिन्यांपासून साईड ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : रेल्वे प्रशासनाने अहमदनगर- परळी वैजनाथ (बीड) या शटल रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वी शानदार उद्‌घाटन केले. अहमदनगर स्थानकावर तेव्हापासून शटल रेल्वे साईड ट्रॅकवर उभी आहे. वजनदार व्यक्तींच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नसल्याने ही रेल्वे सुरू झाली नसल्याचे समजते.

अहमदनगर- परळी वैजीनाथ (बीड) या बहुप्रतीक्षेतील शटल रेल्वेचे शानदार उद्‌घाटन झाले. या मार्गावरील विविध स्थानकांत चाचणी घेतानाची छायाचित्रे झळकली. ही रेल्वे इंजिन व दहा बोगींसह गेल्या तीन महिन्यांपासून अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या साईड ट्रॅकवर बेवारस अवस्थेमध्ये उभी आहे. या शटलची किंमत काढल्यास ती दहा कोटी रुपये असेल.

दुसरीकडे, नगर- पुणे रेल्वे शटल सेवा प्रायोगिक तत्त्वावर का होईना, सुरू करण्यासाठी जागरूक नागरिक मंच प्रयत्नशील आहे. त्यांनी यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली. पुण्याचे अंतर रस्त्याने कापण्यासाठी चार तास लागतात. मोठ्या वाहतुकीमुळे त्यात भरच पडते. आष्टी-बीड येथील राजकीय पुढाऱ्यांच्या हट्टामुळेही त्या शटलचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो प्रकार केवळ फोटोसेशनपुरता होता, असा जागरूक नागरिक मंचाच्या सुहास मुळे यांचा आरोप आहे. परळीसाठी आणलेली रेल्वे एकाच जागी गंजत नगर स्थानकावर उभी आहे. ना ही शटल आष्टी- बीड- नगर- पुणे अशी सुरू झाली, ना आष्टी- नगर धावली. आताही वेळ गेली नाही. ती नगर-पुण्यासाठी सुरू करता येईल.

या मागणीत बदल न झाल्यास चपलांचा हार घालून नैवेद्य रेल्वेच्या केंद्रीय मंत्र्यांना आणि जनरल मॅनेजरना पाठविला जाईल, असा इशारा जागरूक नागरिक मंचाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT