ICU Bed Sakal media
अहिल्यानगर

अहमदनगर : आयसीयूमध्ये इन्चार्ज डॉक्टरच नव्हते

पोलिस उपमहासंचालक शेखर यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयास शनिवारी लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित विभागाचा पदभार असलेले डॉक्‍टर या फुटेजमध्ये घटनास्थळी नसल्याचे जाणवत आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे पोलिस उपमहासंचालक बी. जी. शेखर यांनी दिली.

नाशिक विभागाचे पोलिस उपमहासंचालक शेखर यांनी सोमवारी (ता. ८) जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी आदी उपस्थित होते.

शेखर म्हणाले, की जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तीन-चार सीसीटीव्ही कॅमेरे आगीच्या वेळी सुरू होते. या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, या विभागाचा पदभार असलेले डॉक्‍टर घटनास्थळी आढळून येत नाहीत. तांत्रिक माहिती असणाऱ्या तज्ज्ञांची तपासासाठी मदत घेतली जाणार आहे. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.

या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून ही परिस्थिती हाताळली असती, तर आणखी काही रुग्ण वाचले असते. याप्रकरणी सध्या दोन व्यक्‍तींचे जबाब झाले आहेत. तपासामध्ये ज्या बाबी स्पष्ट होतील, त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT