bandh was annaunced in belapur and shrirampur Sakal
अहिल्यानगर

मुलीचे अपहरण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी श्रीरामपूर, बेलापुरात बंद

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याच्या निषेधार्थ आज (सोमवारी) श्रीरामपूरसह बेलापुरात ‘बंद’ पाळण्यात आला. अपहरणाची घटना घडून अनेक दिवस उलटूनही तपास लागला नसल्याने, हिंदुत्ववादी संघटनांनी ‘बंद’चे आवाहन केले होते.

बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह बेलापूर गावातील दुकाने आज दिवसभर बंद होती. या घटनेसंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस ठाण्यासमोर मोर्चा व बेलापुरात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर आज पुन्हा ‘बंद’ पाळण्यात आला. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. याला सुमारे २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळण्यात आला. आज सकाळपासून शहरातील मेन रोड, शिवाजी रोड, नेवासे रोड, तसेच संगमनेर रस्त्यावरील दुकाने बंद होती. शहरातील मेन रोडवरील मुख्य बाजारपेठेसह सोनार लेनमधील दुकाने बंद होती.

अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने श्रीरामपूरसह बेलापुरात बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

SCROLL FOR NEXT