bhandardara dam esakal
अहिल्यानगर

आता ठरले! भंडारदरा जलाशयाचेही नाव बदलणार; देणार 'हे' नाव

शांताराम काळे

अकोले (जि.अहमदनगर) : आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत भंडारदरा (bhandardara dam) येथील विल्सन जलाशयाचे नाव आता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या (ता.९) क्रांती दिनी हा कार्यक्रम पार पडणार असून याबाबतची माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली. मात्र या नव्या नावाबाबत सध्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे

ठरलं 'हे' नाव!

भाजपचे राष्ट्रीय मंत्री तथा आदिवासी विकास परिषदेचे राज्याध्यक्ष आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुण एकत्र येऊन विल्सन जलाशयाला 'क्रांतिवीर राघोजी भांगरे' हे नाव देण्यात येणार आहेत. याबाबत राज्य व केंद्र सरकारला पत्रव्यवहार केल्याचे संयोजकांनी सांगितले. वैभव पिचड म्हणले की, जल, जंगल, जमीन हे आदिवासी समाजाचे हक्काचे असून आद्यक्रांतीची मशाल ज्यांनी पेटविली आणि सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच होणारे शोषण थांबविण्यासाठी ज्यांनी मोठा लढा उभारला अशा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव विल्सन डॅमला देण्यात येणार आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी विल्सन डॅमचे 'आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे धरण' असे नामकरण होत आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड (madhukar pichad) यांच्या प्रेरणेने आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत भंडारदरा येथील विल्सन जलाशयाचे नाव आता क्रांतिवीर राघोजी भांगरे असे होणार आहे. येत्या (९ ऑगस्ट) क्रांती दिनी हा कार्यक्रम येथे होत आहे, अशी माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT