Ahamadnagar Exit Poll Esakal
अहिल्यानगर

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

Ahamadnagar Exit Poll: लोकसभा निवडणुकीचे आज एक्झिट पोल समोर येत आहेत. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार आघाडीवर असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचे आज एक्झिट पोल समोर येत आहेत. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार आघाडीवर असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर असण्याची शक्यता आहे. निलेश लंके शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर डॉ. सुजय विखे पाटील महायुतीकडून भाजपाचे उमेदवार आहेत.

एक्झिट पोल येण्याआधी "मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होतं, मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मंगळवारी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर याठिकाणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

SCROLL FOR NEXT