Online Fraud Sakal
अहिल्यानगर

Online Cheating : फेक कंपन्या अन् रोजगाराचा ट्रॅप; अनेक जण जाळ्यात

डेटा टायपिंगचा जॉब असल्याचे सांगून त्यावर दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखविले जाते. या जॉबसाठी करार करून घेतला जातो.

गोरक्षनाथ बांदल

डेटा टायपिंगचा जॉब असल्याचे सांगून त्यावर दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखविले जाते. या जॉबसाठी करार करून घेतला जातो.

अहमदनगर - सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात असतात. त्यांतील अनेक जण ‘गुगल’वर जॉब सर्च करतात. सायबर भामट्यांनी हे हेरून अशा तरुणांसाठी जॉब देणाऱ्या फेक कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्याकडून अनेकांची फसवणूक होत आहे. त्यांच्या ट्रॅपमध्ये एखादा अडकला, की हजारो रुपयांना गंडा घातला जात आहे.

डेटा टायपिंगचा जॉब असल्याचे सांगून त्यावर दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखविले जाते. या जॉबसाठी करार करून घेतला जातो. त्यानंतर डेटा टायपिंगमध्ये जादा चुका होत असल्याचे सांगून कोणताही मोबदला दिला जात नाही. तरुणांनी काम सोडून दिल्यास, कराराप्रमाणे काम न केल्याने कंपनीचे नुकसान झाल्याचे सांगून कराराचा भंग केल्याने ४० ते ५० हजारांची मागणी केली जाते. भरपाई न दिल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. भरपाई न दिल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असेही धमकावले जाते. परराज्यातील पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्रास दिला जातो.

फसवणुकीचे स्वरूप

या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये, दिवसात फक्त दोन तास काम करून दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमवा, कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरून डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना ५० हजार रुपयांपर्यंत कमाई करा, असे कामाचे स्वरूप दिलेले असते. ज्या कंपनीचे जॉब आहेत, तेथेच लिंक असते. परदेशातील नामांकित विद्यापीठाने सर्व पुस्तके डिजिटल स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुस्तकांचे पाने पाठविली जाणार आहेत. ती पाने टाइप करून पाठवायची आहेत, असे कामाचे स्वरूप असल्याचे सांगितले जाते.

डेटा देऊन फसवणुकीचे प्रकार काही ठिकाणी आढळू लागले आहेत. कोणत्याही कंपनीच्या डेटा एन्ट्रीच्या कामाबाबत खात्री करावी. अनोळखी कंपनीसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. अशा कंपन्यांना कागदपत्रे, बँकेचा तपशील पाठवू नका.

- प्रतीक कोळी, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

SCROLL FOR NEXT