Burn eight acres of sugarcane at Ozar 
अहिल्यानगर

ओझर येथे आठ एकर ऊस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः तालुक्‍यातील ओझर खुर्द शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या आठ एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ही घटना आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. 

आगीमुळे आठ ते नऊ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मनोली ते ओझर खुर्द रस्त्यालगतच्या क्षेत्रातील दौलत बनवाले यांच्या शेतातील एक हेक्‍टर, बाबासाहेब बनवाले यांचा एक हेक्‍टर आणि राजेंद्र व संजय बाळासाहेब शिंदे यांच्या शेतातील प्रत्येकी 24 गुंठे व प्रभाकर बाबुराव पराड यांचा दोन एकर ऊस जळाला.

विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली, अशी माहिती मिळताच संगमनेर थोरात कारखान्याच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी धाव घेतली तसेच या परिसरातील ग्रामस्थ व युवकांनीही धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच पुंजाहरी शिंदे, बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT