burning car esakal
अहिल्यानगर

संगमनेर-शिबलापूर मार्गावर ‘ द बर्निंग कारचा ’ थरार

आनंद गायकवाड

संगमनेर : संगमनेरहून आश्वी खुर्दकडे येणाऱ्या चालत्या कारला अचानक आग ल्यागल्याने, झालेल्या दुर्घटनेत कारची हानी झाली. ही घटना संगमनेर शिबलापूर मार्गावर रात्री (ता.19) आठच्या सुमारास तालुक्यातील शिबलापूर शिवारातील गोसावी फाटा परिसरात घडली.

उपसरपंचांच्या गाडीने घेतला पेट! संगमनेर-शिबलापूर मार्गावर ‘द बर्निंग कारचा’ थरार

याबाबत अधिक माहिती अशी, आश्वी खुर्दचे उपसरपंच सुनिल तुकाराम मांढरे व उमेश गाढे संगमनेहून गावाकडे परतत होते. त्यावेळी गोसावी फाटा परिसरात यांच्या कारमधून (एमएच 05 एजे. 7714) च्या इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडून अचानक धुर येऊ लागला. त्यामुळे कार थांबवून त्यांनी काय झाले असावे याची पाहणी करीत असतानाच, अचानक आगीच्या ज्वाला उठून, त्यात कारने पेट घेतला. वाहनातील इंधन, फोम व रेक्झीनचे सीट आदी ज्वलनशिल वस्तूंमुळे ही आग भडकली. दोघेही या वेळी कार बाहेर असल्याने सुदैवाने बचावले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होवून त्याने आग विझवली. मात्र तो पर्यंत आगीत कार जळून खाक झाली होती. याबाबत मांढरे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात झालेल्या घटनेबाबत माहिती देत नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT