sugarcane esakal
अहिल्यानगर

उसाच्या शेतात लपविला 721 किलो गांजा; दोन महिलांना अटक

गोरक्षनाथ बांदल

तिसगाव (जि.अहमदनगर) : उसाच्या शेतात लपवून ठेवलेला ७२१ किलो (किंमत ५७ लाख) गांजा साठ्यावर पोलिसांनी छापा टाकला. शेवगावचे विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी, सोनई व शनिशिंगणापूर पोलिसांनी रविवारी (ता.२९) पाथर्डी तालुक्‍यातील मिरी परिसरातील शंकरवाडीमध्ये ही कारवाई केली. दोन महिलांना अटक करण्यात आले आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती

पाथर्डी तालुक्‍यातील मिरी परिसरातील शंकरवाडी येथील बापू आव्हाड, साहेबराव आव्हाड, गोरख आव्हाड, विलास आव्हाड यांनी उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजा लपविला असल्याची माहिती गुप्त बातमीदारकडून मिळाली. शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी रविवारी सकाळी मोठ्या पोलिस पथकाच्या ताफ्यासह छापा टाकला. या शेतात आरोपी सुमन साहेबराव आव्हाड (वय ४०) आणि सावित्राबाई बापू आव्हाड (वय ६५, रा. शंकरवाडी, ता. पाथर्डी) या आढळून आल्या. त्यांच्या ताब्यातून ७२१.१४२ किलो ग्रॅम वजनाचा अंदाजे ५७ लाख ६९ हजार १३६ रुपयांचा गांज्याचा साठा आढळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा गांजा हा आरोपी नारायण भालके (पूर्ण नाव माहित नाही) आणि बाळासाहेब उर्फ बबन दहातोंडे (पूर्ण नाव नाही, दोघे रा. चांदा, ता. नेवासे) यांचा असल्याचे सांगितले. बापू आव्हाड, साहेबराव आव्हाड, गोरख आव्हाड, विलास आव्हाड यांना राखण करण्यासाठी दिला असल्याचे सांगितले. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर कायंदे, सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर थोरात, शनिशिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांच्यासह पोलिस कर्मचारी भगवान सानप, देविदास तांदळे, अनिल बडे, पोपट आव्हाड, एकनाथ बुधवंत, प्रतिभा नागरे यांचा या पथकात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT