Chhatrapati Sambhajinagar esakal
अहिल्यानगर

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर विभागात नाहीत अनधिकृत शाळा; शिक्षणाधिकाऱ्यांचा दावा

कारवाईच्या आदेशानंतरचे वास्तव

रुपेश नामदास

Chhatrapati Sambhajinagar: अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांवर कारवाईचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय उपसंचालक कार्यालयाने पत्र जारी करत सर्व जिल्ह्यांना अनधिकृत शाळांची माहिती ३० एप्रिलपूर्वी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आमच्याकडे अनधिकृत शाळाच नसल्याचा दावा विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांनी केला आहे.

मुदतीनंतरही अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालकांनी काढलेल्या पत्राला उत्तर देण्यास पाच दिवस टाळाटाळ केली. त्यानंतर बीड, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी आमच्याकडे एकही अनधिकृत शाळा नसल्याचे हमीपत्र विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे सादर केले आहे.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा अहवाल अद्याप उपसंचालक कार्यालयास सादर झालेला नाही. अजून शाळांची तपासणी सुरु असून येत्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अहवाल प्राप्त होईल, असे विभागीय उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाळांसाठी सूचना

शाळांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही शिक्षण आयुक्तांनी केली आहे. बंद होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करावे. खासगी व्यवस्थापनाद्वारे संचालित व विविध शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांनी दर्शनी भागात मान्यताप्राप्त असल्याची सविस्तर माहिती फलकावर लावावी, असे शिक्षण आयुक्त कृष्णकुमार पाटील यांनी आदेशात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT