नांदूरमध्यमेश्‍वर  Google
अहिल्यानगर

गोदावरीतील विसर्गात मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोरक्षनाथ बांदल

कोपरगाव (जि. नगर) : कोपरगाव तालुक्‍यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्‍वर येथून बुधवारी (ता.२२) सायंकाळी उशिरा ३२ हजार ६९२ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून त्यामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.


नागरिकांनी तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, सखल भागात राहणाऱ्या कुटुंबांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, नदी, ओढे व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे, नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडून जाऊ नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी चढू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्युतवाहिनी जवळ थांबू नये, आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२४२३-२२२७५३ यावर संपर्क करावा, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT