Corona Patient Maharaj was staying in Shrigonda 
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात मुक्कामी होते कोरोनाग्रस्त महाराज...भक्तांनी केली सेवा

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : नगर जिल्ह्यात कोठे ना कोठे कोरोनाचे रूग्ण  सापडत आहेत. कर्जत आणि राहुरी तालुक्याला त्यापासून बचाव झाला होता.परंतु तेथेही रूग्ण आढळून आले आहेत. दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातही बाधा झाली आहे. त्या तुलनेत शेवगाव आणि श्रीगोंदे हे तालुके कोसो नाही पण दूर आहेत. कारण या तालुक्याच्या चोहोबाजूंनी कोरोना रूग्णांचा वेढा आहे. 

चारही बाजूंनी कोरोनाग्रस्त तालुके असताना श्रीगोंदयात भीतीचे वातावरण आहे. त्यातच श्रीरामपूर येथे एक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. तो रुग्ण दोनच दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात येऊन गेले असून त्यांच्या सानिध्यात येथील एक डॉक्टरसाहेब आले आहेत. त्यामुळे श्रीगोंदेकरांचे टेन्शन वाढले आहे.

श्रीरामपूरमधील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. ते महाशय लॉकडाउन असतानाही 21 मे रोजी श्रीगोंद्यात आले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी भक्त असणाऱ्या एका डॉक्टरचा पाहुणचारही घेतला होता. त्यांनी येथे एक दिवस मुक्काम केला. येथे आणले त्यावेळी त्यांची तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांना बाधा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, येथून गेले आणि ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला.

ते रुग्ण महाराज असल्याचे समजले. त्यातच या डॉक्टर महाशयांनी हे सगळे प्रशासनापासून लपवून ठेवल्याचे समजते.
आता ते डॉक्टर नगरला  कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या घरातील व्यक्तींनाही आता कोरोन्टाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. आता या डॉक्टरकडे किती पेशंट गेले होते. आणि ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, याची माहिती घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT