Corona Superfast in Ahmednagar 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोना सुपरफास्ट...आजही निघाले अकरा बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज किमान दहा रूग्ण सापडत आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यापासून हा आकडा वाढला आहे. मुंबई आणि पुणे येथून तसेच रेड झोनमधून आलेल्यामुळे जिल्ह्यात बाधा होत आहे. त्यांच्यामुळे कुटुंबियांनाही बाधा होत आहे.

आज आणखी ०५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज मिळाला. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ०१,  संगमनेर येथील एक, मसणे फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील ०२ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७८ आहे.

जिल्ह्यात आणखी ११ नवीन रुग्ण तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह झाला आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची आकडेवारी अशी ः अकोले तालुका ०६, जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित आहे.
वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित निघाला. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.

संगमनेर तालुका ०२, डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिला बाधित आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे. श्रीगोंदा ०१, कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित सापडली. लोणी, राहाता ०१, येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आली. नगर शहर ०१, स्टेशन रोड, अहमदनगर येथील ३३ वर्षीय महिला बाधित आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६३ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात २६, जिल्ह्यात ८७, इतर राज्यातील ०२, इतर देशातील ०८ व इतर जिल्ह्याती ४० आहेत. जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ७३ (+०२संगमनेर) आहेत.  एकूण स्त्राव तपासणी केलेल्यांची संख्या २६१३ झाली आहे. निगेटीव  २३५१ रिजेक्टेड आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT