Corona test to be held in Ahmednagar after ICMR permission 
अहिल्यानगर

आयसीएमआरच्या परवानगीनंतर नगरमध्ये होणार कोरोना चाचणी, दिवसभरात ३०० टेस्ट

सकाळ वृत्तसेवा

नगर - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) उभारण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. चाचणी स्वरुपात आज येथे सुरुवात झाली आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर कोरोना संदर्भातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रयोगशाळेला भेट देऊन सद्य:स्थितीची माहिती घेतली आणि पाहणी केली. या कोरोना चाचणी लॅबमुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराची लक्षणे असणा-या  व्यक्तींची चाचणी लवकर करणे सोपे होईल आणि प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह या कोरोना टेस्ट लॅबला भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.

दैनंदिन स्वरुपात याठिकाणी किती चाचण्या होणार, येथील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने अतिशय पाठपुरावा करुन कमी कालावधीत ही लॅब उभारणी केली आहे. आयसीएमआर निश्चितपणे लवकरच याठिकाणी चाचण्यांना परवानगी देईल, असे त्यांनी नमूद केले.

सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील रुग्णांच्या कोरोनासंदर्भातील चाचण्या सुरुवातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्या जात आहेत. येथे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेली लॅब आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तयार करण्यात आल्याने त्यास लवकरच चाचण्यांसाठी मान्यता मिळेल. प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर चाचण्या याप्रमाणे २४ तासांत ३०० चाचण्या करण्याची क्षमता या लॅबची असेल, अशी माहिती त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT