Court dismisses case against Indorikar Maharaj 
अहिल्यानगर

जय हरी! इंदोरीकर महाराज सुटले, कोर्टाने खटला केला रद्द; अंनिस हायकोर्टात जाणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः पीसीबीएनडीटी (गर्भलिंगनिदान चिकित्सा प्रतिबंधक) कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला व धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला. त्यामुळे महाराजांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त करीत पेढे वाटप केले.

इंदोरीकर महाराजांविरोधात लिंगभेद केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकरमहाराजांनी सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असे विधान कीर्तनातून करीत खळबळ उडवून दिली होती.

या कीर्तनाचे व्हिडिओ यू ट्यूबवर प्रसिद्ध होत होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराजांविरोधात जिल्हा समितीकडे सादर केले होते. त्यावरून महाराजांवर गुन्हा दाखल केला होता. अंनिसनेही त्यांच्याविरोधात हस्तक्षेप अर्ज केला होता.

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्याने वारकरी संप्रदायातील समर्थक तसेच सोशल मीडियातूनही महाराजांना मोठा पाठिंबा मिळत होता. संगमनेर न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्याचा सायंकाळी निकाल लागला.

न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराजांवरील खटला रद्द झाल्याची माहिती समजताच इंदोरीकरप्रेमींना मोठा आनंद व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून पेढेवाटप झाले.

अंनिस हायकोर्टात जाणार

कोर्टाने बालाजी तांबे यांच्या खटल्याचा आधार घेतला. तसेच धार्मिक ग्रंथाचाही त्यांनी आधार घेतला. इंदोरीकरमहाराज बोलले ते धार्मिक ग्रंथात नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या बाजूने हा निकाल दिला आहे. परंतु आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. प्रवृतींच्या विरोधातील ही लढाई आहे. पीसीबीएनडीटी कायद्याचे हे उल्लंघन आहे.

-रंजना गवांदे, अंनिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Thane Rain Traffic : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे, वाहतूक कोंडीची काय आहे स्थिती?

Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांची महाराष्ट्रातील नेते भेट घेणार

MHADA Pune: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाच्या ताथवडे प्रकल्पातील ६३४ फ्लॅट्सची दुसरी सोडत जाहीर

Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

SCROLL FOR NEXT