Milk sakal
अहिल्यानगर

Cow Milk Rate : गाईच्या दूधदरात पुन्हा दोन रुपये घट

शेतकऱ्यांना दररोज कोट्यवधींचा फटका

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - उन्हामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढविलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे.

दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज १५ कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक पुरते हैराण झाले आहे.

राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्र आहे. बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे.

त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. उष्मामुळे साधारणपणे तीस ते चाळीस लाख लिटरपर्यंत दुधात घट झाली आहे. नगरसह उन्हाळ्यात लग्नसोहळे व अन्य कार्यक्रमामुळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते.

जनावरे जगविण्यासाठी कसरत

राज्यातील पंचवीस जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे, त्यावर कोणतीच उपाययोजना नाही. दुष्काळी भागात यंदा छावण्या सुरू केल्या नाहीत, चारा डेपोही उभारले नाहीत. त्याऐवजी चारा उत्पादनावर भर दिला. अनेक भागांत चारा, जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळवताना दूध उत्पादकांना कसरत सुरू आहे, असे असताना दुधाचे दर पाडून दूध व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दूध उत्पादक करत आहेत.

राज्य शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. साधारण पस्तीस रुपये दर मिळावा. कारण चारा, पशुखाद्याचे दर वाढताना दूधदर कमी करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न आहे.

- देविदास पिसे, दूध उत्पादक, मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT