Marriage sakal
अहिल्यानगर

Crime : 16 वर्षांच्या मुलीचं २९ वर्षांच्या मुलासोबत लग्न! नवरदेवासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल; आता...

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : तालुक्यातील कनोली येथे 29 वर्षे वयाच्या वराशी अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2007 चे कलम 9,10 प्रमाणे संगमनेर पोलीस ठाण्यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षे 8 महिने 14 दिवस या वयाच्या मुलीचे कायद्याने लग्नाचे वय पूर्ण नाही हे माहिती असतानाही श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मंगळवार( 2 मे) रोजी तालुक्यातील कनोली येथे आरोपीच्या घरासमोर संगनमताने लावून देण्यात आला.

याबाबत माहिती समजल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे वय 38 रा.हनुमंतगाव (राहाता ) यांनी अल्पवयीन मुलीचा जन्मदाखला व आधार कार्ड वरील जन्मतारखेची खात्री व चौकशी केली. त्यानंतर याबाबत आरोपी प्रवीण पोपट वर्पे (नवरदेव वय 29) पोपट एकनाथ वर्पे, रंजना पोपट वर्पे तिघेही राहणार कनोली ता. संगमनेर व पीडित मुलीची आई या चार जनांविरोधात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊन बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढूमने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT