Shravan  Sakal
अहिल्यानगर

श्रावणातल्या यात्रा कोविडमुळे या वर्षीही बंदच

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. नगर) : हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्याची सुरवात येत्या सोमवारपासून (ता. ९) होत आहे. मात्र, या महिन्यात महादेवाची भक्ती करणाऱ्या भाविकांना, कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरांत दर्शनासाठी जाता येणार नाही.

सोमवार या महादेवाच्या वारापासून या वर्षी श्रावण महिन्याचे आगमन होत आहे. संगमनेरात शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये निझर्णेश्वर (कोकणगाव), खांडेश्वर, कपारेश्वर (खांडगाव), श्री क्षेत्र बाळेश्वर (जवळे बाळेश्वर), रामेश्वर (धांदरफळ), अग्नेश्वर (सुकेवाड़ी), दुधेश्वर (निमगावजाळी) या ठिकाणांचा समावेश होतो. श्रावणाच्या पवित्र पर्व काळात या सर्व ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे यातील खांडगाव, निझर्णेश्वर, धांदरफळ व जवळे बाळेश्वर या ठिकाणी तसेच साकूर येथील श्री. बिरोबा देवस्थान या ठिकाणी महिनाभर यात्रोत्सव साजरा केला जातो. यात्रेतील खेळण्या-पाळण्यांची दुकाने, खाद्य व इतर गृहोपयोगी वस्तू, फळे यांतून मोठी आर्थिक उलाढाल होते.

परिसरातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी धार्मिक, तसेच मनोरंजनाचे साधन असलेल्या या यात्रांवर दोन वर्षांपासून कोविडचा परिणाम झाला आहे. गर्दीमुळे कोविड प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने जिल्हाधिकाऱ्यांनी याही वर्षी तालुक्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविक प्रत्यक्ष दर्शनाला मुकणार असले, तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे स्वागत करीत, मंदिरांच्या विश्वस्तांनी धार्मिक पूजापाठ करण्याचा व यात्रोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात कोणीही दर्शनासाठी मंदिरात येऊ नये, असे आवाहन खांडेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानूभाऊ गुंजाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT