Crop Esakal
अहिल्यानगर

कोरोनाचा कहर, शहरातून थेट बांधावर..!

शेतकरी तसेच शेतमजूरही आता 'क्वारंटाइन' झाले असल्याने शेतीच्या कामांचे वेळापत्रक बिघडले आहे.

सचिन गुरव

सिद्धटेक (अहमदनगर) : मागीलवर्षी लक्षणीयरीत्या शहरी जीवन विस्कळीत केल्यानंतर यावर्षी कोरोना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला आहे. अनेक मध्यमवर्गीय शहरांमधून गावाकडे परतले आहेत. त्यामुळे गावांमध्ये गर्दी झाल्याने गावातील नागरिक शेतांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. यातूनच शेतांमधील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. शेतकरी तसेच शेतमजूरही आता 'क्वारंटाइन' झाले असल्याने शेतीच्या कामांचे वेळापत्रक बिघडले आहे.

भीमापट्ट्यातील काही गावांचा अपवाद वगळता सर्वच गावे तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातील अनेक गावे तर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' बनली आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी खेड्यापाड्यात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या अंमलबजावणीमध्ये शेतीशी संबंधित व्यवसायांना काही प्रमाणात मुभा असली तरी, शेतकरी तसेच शेतमजूरांकडून नियमावलीचे काटेकोर पालन होत नसल्याचे दिसते. त्याचप्रमाणे शेतातील बहुतांश कामे ही शेतकरी स्वतः करू शकत नाहीत. त्यामुळे या कामांसाठी शेतमजुरांची आवश्‍यकता असते. त्यातूनच गावोगावी शेतमजुरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या अनेक ठिकाणी कामे करत असतात.

'पॉझिटीव्ह'मुळे मजूर मिळेना...

शेतमजुरांच्या टोळ्या असल्या तरी एखाद्या शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असली तरीही आणि बरी झाल्यानंतरसुद्धा त्या शेतकऱ्याकडे मजुरी करण्यासाठी कुणी धजावत नाही. त्यामुळे मजुरांअभावी शेतातील कामांचे वेळापत्रक बिघडले आहे.

गावे-वाड्या 'हॉटस्पॉट'...

भीमा नदीकाठावरील मोठ्या बाजारपेठा असलेली गावे तसेच वाड्या-वस्त्या देखील आता कोरोनाच्या 'हॉटस्पॉट' झाले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना मात्र कुणीही दिसत नाही. निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे भासमान चित्र नागरीकांकडून तयार केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके नागपुरात आंदोलन करणार, तारीख ठरली; परवानगीची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

SCROLL FOR NEXT