leopard google
अहिल्यानगर

शेतकऱ्याच्या धाडसामुळे शिकारीच झाला जेरबंद; सर्वत्र होतंय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

बोटा (जि. नगर) : भक्ष्याच्या शोधात फिरत असताना बिबट्याला एका खोलीत शेळ्या असल्याची चाहूल लागली. त्याने शिकारीसाठी खोलीभोवती फेरी मारली. खोलीच्या लोखंडी जाळीच्या दरवाजावर त्याने झेप घेतली तेव्हा सिमेंटची चौकट फुटली. खोलीत प्रवेश करीत बिबट्याने पाच बोकड, तीन शेळ्या ठार केल्या, तसेच तीन बोकड जखमी केल्याची घटना पठार भागातील वनकुटे (ता. संगमनेर) येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. आत अडकलेल्या बिबट्याला पाहून धाडसी शेतकऱ्याने जाळीचा दरवाजा ओढून बंद केल्याने, शिकार करण्यासाठी आलेला हा ‘शिकारी’च जेरबंद झाला.

वनकुटे गावाच्या कळमजाई भागात राहणारे शेतकरी प्रकाश रेवजी हांडे यांच्या पाच बाय सात फूट आकाराच्या छोट्या शेडमध्ये १६ शेळ्या-बोकड कोंडले होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने, या जनावरांच्या शिकारीचा प्रयत्न केला. त्याने झेप घेतल्यामुळे सिमेंटची चौकट मोडली. तेथे निर्माण झालेल्या फटीतून त्याने आत प्रवेश करीत, शेळ्यांवर हल्ला चढवला. त्यांच्या ओरडण्याने जाग आलेल्या हांडे यांनी प्रसंगावधान राखून, तुटलेली चौकट पुन्हा ओढून बांधून टाकली. त्यामुळे बिबट्या आत अडकला.

ही माहिती मिळताच वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सुजाता टेंबरे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ, आंथा काळे यांनी घटनास्थळी पिंजरा लावला. तीन चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात आला. सुमारे पाच वर्षे वयाचा, पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या आहे. प्रकाश हांडे यांचे प्रसंगावधान व धाडसाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

बंदिस्त जागेत कोंडल्याने, चिडलेल्या बिबट्याने जास्त प्रमाणात जनावरांवर हल्ला केला, अन्यथा एक शेळी घेऊन तो निघून गेला असता. अशाप्रकारे धोका पत्करणे जिवावर बेतण्याची शक्यता असते. चिडलेला बिबट्या अधिक हिंस्र होतो.

- रामदास थेटे, वन परिमंडल अधिकारी, घारगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana: कर्जमुक्ती समितीकडील १२३ तक्रारींचा निपटारा; जिल्हाभरात ८४, ५१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT