Five corona patients in Nagar district
Five corona patients in Nagar district 
अहमदनगर

श्रीरामपूरच्या त्या मृताच्या कुटुंबातील चौघे निघाले बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर ः  जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघांचा समावेश आहे. दरम्यान आज १४६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पारनेर मधील ४५ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर मधील ३० व २४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष आणि ७ वर्षीय मुलगा बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

श्रीरामपूरसह तालुक्यात आता कोरोनाचा समुह संर्सग वाढत अाहे. आज येथील प्रभाग दोन मध्ये चौघे कोरोनाबाधित आढळुन आले. याच परिसरात शनिवारी (ता. 4) एका कोरोनाबाधिताचा कुटुबियांनी दफनविधी केला होता. संबंधित बाधित व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

दफनविधी आटोपल्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयातुन मृतदेह कोरोनाबाधित अाहे. पुन्हा नगरला पाठवा असा निरोप आला होता. परंतु तोपर्यंत दफनविधी उरकल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार स्थानिक आरोग्य विभागाच्या लक्षात येताच त्यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीना ताब्यात घेत तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव घेतले. आज त्यातील चौघांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे शहरात कोरोना फैलाव वाढला आहे. 

मागील आठवड्यात येथील एक अधिकारी कोरोनाबाधित आढळुन आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील चौघांसह एक सहकारी तर लोकप्रतिनीधी व त्याच्या पत्नी तसेच त्यांचा चालक कोरोबाधित झाल्याने शहरात कोरोनाची साखळी वाढली. प्रशासन कोरोनाची साखळी तोडत असताना शनिवारी (ता. 4) पहाटे प्रभाग दोन परिसरातील एकाचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.

कुटुंबीयाच्या मागणीनुसार जिल्हा आरोग्य विभागाने सदर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कुटुंबियांनी मृतदेह प्रभाग दोन परिसरात आणुन आरोग्य आणि पोलिसांच्या उपस्थित दफनविधी केला. त्यानंतर मृत रुग्ण कोरोनाबाधित असुन मृतदेह तात्काळ नगरला पाठवा असा निरोप नगर येथुन आला. परंतू तो पर्यंत दफनविधी उरकला होता.

हा सर्व प्रकार शहरातील नागरीकांना माहित पडताच अनेकांनी संताप व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या बेजबादार कार्यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक प्रशानाने त्यावर सारवासारव केली. यासंर्भात येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. दफनविधी केलेल्या कुटुंबातील चौघांचे तपासणी अहवाल आज कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 24 झाली अाहे. कोरोनामुळे तीघांना जीव गमवावा लागला. सध्या तपासणी अहवाल येण्यास विलंब होत असल्याने क्वाॅरंटाईन केलेल्यांसह त्यांच्या कुटुंबियाची धाकधुक वाढली आहे. 11 कोरोनाबाधित रुग्णांवर संतलुक रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गंभीर स्वरुपातील रुग्णांना नगरला पाठविले जाते. तसेच ग्रामीण रुग्णालयात घशातील स्त्राव घेवुन तपासणीसाठी नगरला पाठविले जातात. अहवाल मिळेपर्यंत आंबेडकर वस्तीगृह, ग्रामीण रुग्णालयात क्वाॅरंटाईन केले जाते. तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 80 हुन अधिक जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT