Ahmednagar Fire Team eSakal
अहिल्यानगर

अहमदनगर अग्नितांडव : सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात ४ जणांना अटक

दौलत झावरे

अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आज (मंगळवारी) सायंकाळी चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांचे निलंबित झालेले असून शेख आणि चंन्ना आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला सहा नोव्हेंबरला आग लागली . या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक व सामाजिक संघटनांनी केलेली आहे.

या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्याच दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्यासह एकूण सहा जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये चार जणांचे निलंबन तर दोन जणांवर बडतर्फ कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना निलंबित केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह परिचारिका संघटनांनी आंदोलन पुकारून या घटनेचा निषेध केलेला असून सर्वांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे, अशी मागणी केली आहे. ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना उडवलं, थरार CCTVमध्ये कैद

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT