Ahmednagar Fire Team eSakal
अहिल्यानगर

नगर जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्हा रूग्णालयातील जळीतकांड प्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला शनिवारी (ता. 6) आग लागली होती. या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही कारवाई केली. तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रिजवान अहमद मुजावर यांनी सरकारच्या वतीने फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी प्रारंभी तपास केला. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना मंगळवारी (ता.9) अटक करण्यात आली. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या चार ही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीमागे दडलय काय?, यासाठी शेट्टींनी दिली ठाकरेंना हाक

Beed News: आता काय हंडा हवेने भरू का?; बीडमध्ये नळाला पाणीच येईना; अमृत योजनेचा पुरता बोजवारा

US-इराण युद्धात लहानसा देश मालामाल, होर्मुझ बंदचा फायदा; एका जहाजासाठी मिळतायत ३३ कोटी

ईद 2027 साठी सलमान खानचा मोठा धमाका ! दिग्दर्शक वंशी पैदीपल्लींसोबत पुढच्या ॲक्शनपटाची घोषणा

Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT