हसन मुश्रीफ ई सकाळ
अहिल्यानगर

तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर - हसन मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

जामखेड (जि. नगर) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर आहे. यावेळी रुग्णसंख्या चौपट वाढणार आहे. तसे होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. उपाययोजना केल्या नाही तर धोका जास्त आहे. नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी. या पार्श्वभूमीवर शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जामखेड येथील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा व याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या पन्नास बेडच्या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सांगळे, उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, सभापती राजश्री मोरे, सूर्यकांत मोरे, मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, की राज्यात ऑक्सिजन कमी पडू शकतो. याची दक्षता म्हणून जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

आमदार पवार म्हणाले, की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेडमध्ये सर्वांचे सहकार्य लाभले. सुरवातीला कोरोनाला प्रतिबंध करताना, बाहेरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विलीनीकरण कक्षात ठेवून तेथेच उपचार केले जात होते. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी जामखेड व कर्जत येथे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली. यासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Kanakagiri Sambhaji Maharaj Memorial : कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर उभारली ४०० किलोची मेघडंबरी; पुण्यातील शिवप्रेमींचा ‘गनिमी काव्या’ने यशस्वी उपक्रम

Marathi News Live Updates : दिल्लीसह देशातील विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित सर्व एफआयआर रद्द- सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT