Hospitality of corona infected patient in Kopargaon 
अहिल्यानगर

कोपरगावात कोरोना बाधिताचा पाहुणचार... आजाराची पुन्हा दारावर दस्तक

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : राहता तालुक्यातील ममदापूर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात तालुक्यातील गोधेगाव येथील नऊ जण आल्याने त्यांना शासनाच्या वतीने स्थानिक विलगिकरण करण्यात आले आहे. त्यांचा तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे पुन्हा कोपरगाव तालुक्याचा दरवाजा कोरोना ठोठावतो आहे.

राहाता तालुक्यातील निमगाव येथील एक महिला बाधित झाली होती. त्याच महिलेच्या संपर्कात ममदापूर येथील एक व्यक्ती बाधित झाला होता. तो कोपरगाव येथे येऊन गेला आहे. त्यामुळे राहता तालुक्यातील कोरोना संसर्ग आजाराचे हे लोण आता कोपरगाव तालुक्यांमध्ये पसरते की  काय याकडे लक्ष लागले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी ः राहता तालुक्यात काल एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यातच सदर व्यक्तीही तालुक्यातील गोधेगाव इथे येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. सदर कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात नऊजण आले अाहेत. त्या सातही जणांना शासनाने तालुक्याच्या ठिकाणी विलगीकारण कक्षत ठेवले आहे.

सदर सातही व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पाठविले अाहेत. सदर अहवाल प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा एप्रिलपासून शहरांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्व आस्थापना, व्यवहार टप्प्याटप्प्याने 14 मे पासून सुरू करण्यात आले होते.

एकही रुग्ण नसल्याने शासनाला हे सर्व करता येणे शक्य झाले. मात्र, नव्याने सात जण संपर्कात आल्याने या सात जणांपैकी कोणाला कोरोनाची बाधा होते की काय, अशी भीती सतावते आहे. एकंदर तालुक्याच्या वेशीबाहेर गेलेला कोरोना कोपरगावकरांचा दरवाजा ठोठावतो आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांसह प्रशासनाची झोप उडाली आहे. एकदा का कोरोना रूग्ण सापडला की पुन्हा सील, कंटेन्मेंट झोन असे अनेक सोपस्कार करावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold And Silver: सेबी गोल्ड-सिल्व्हर ईटीएफ नियमांमध्ये सुधारणा करणार? गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार; नवा नियम काय?

USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

SCROLL FOR NEXT