जयंत पाटील SakalNews
अहिल्यानगर

नुकसानग्रस्तांना राज्य सरकार दिलासा देणार : जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम


पाथर्डी (जि. अहमदमगर ) :
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल, असे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर संस्कार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


या वेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे उपस्थित होते. पाटील म्हणाले, की राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी २३ जानेवारीपासून राज्याचा दौरा सुरू केला होता. मात्र, मध्यंतरी कोरोनाची लाट आल्याने दौरा खंडित केला होता. ठिकठिकाणी पक्षीय बैठकांचे आयोजन केले तर कार्यकर्त्याच्या भावना समजून घेता येतात. सामाजिक प्रश्नांची माहितीसुद्धा मिळते. राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी सध्या पाऊस सुरूच आहे. सोयाबीनसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण मराठवाड्यात पक्षीय बैठकीसाठी गेलो होतो.


मला अतिवृष्टीचे घेणे-देणे नाही, हा पंकजा मुंडेंचा आरोप चुकीचा आहे. मी असताना अतिवृष्टी झाली नव्हती, हे मुंडे यांनी समजून घ्यावे. भाजप सध्या इडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT