Khadse criticizes Devendra Fadnavis 
अहिल्यानगर

तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पाहिलाय? नाथाभाऊंचा पुन्हा टोमणा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः राज्यात हे जे काही चाललं आहे, ते सगळ्या जनतेला माहितीय. कोण आणि कशासाठी करतेय. त्यांच्या खटपटी, लटपटी सगळे जाणून आहेत. विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार अस्थिर करायचं. परंतु काहीही केलं तरी जमत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत पाणउतारा केला.
आपल्या जवळचे आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी काही संभ्रम निर्माण करायचा. सरकारवर आरोप करायचे, यात भाजप माहीर आहे. सत्ता गेल्यापासून तुम्ही फडणवीस यांचा चेहरा पाहिलाय का, सत्तेत असताना आणि आता सत्तेबाहेर असताना कसे दिसतात, हे तुम्ही पाहिलंय का.
गेली तीस वर्षे मी विरोधी पक्षात काढली आहेत. विरोधी पक्षाला सरकारविरोधात आरोप करावेच लागतात. तसे हे सुरू आहे. माझं असंही म्हणणं नाही की भ्रष्टाचार पाठिशी घातला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केलं.
श्री. खडसे हे माजी खासदार कै. दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT