lataku bandh operation started by police at Shanishinganapur has come to a halt Sakal
अहिल्यानगर

शनिशिंगणापुरात ‘लटकू बंद’ मोहिमेचा बार फुसका

चंद्रकांत दरंदले


सोनई (जि. अहमदनगर) :
शनिशिंगणापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी हाती घेतलेल्या ‘लटकू बंद’ मोहिमेचा बार फुसका निघाला आहे. दिवाळी सुटीच्या निमित्ताने रस्त्यावर व गावात चारशेहून अधिक लटकूंचा त्रास पुन्हा सुरू झाल्याने, भाविकांमधून नाराजीचा सूर वाढत चालला आहे.

शनिभक्तांच्या वाढत्या तक्रारी व रस्त्यात अडवणुकीमुळे वाहतुकीत होत असलेली अडचण लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी १९ सप्टेंबर रोजी गावातील सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांची बैठक घेऊन ‘लटकू बंद’च्या सूचना दिल्या. पोलिसांनी विशेष पथक तयार करून कारवाई मोहीम सुरू केल्याने सर्व लटकू हद्दपार झाले होते. भाविक व परिसरातील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले होते.

दिवाळी सुटीच्या निमित्ताने सध्या शनिदर्शनासाठी गर्दीचा ओघ वाढला आहे. या संधीचा फायदा घेत सर्व व्यावसायिकांनी पोलिस कारवाईला न डगमगता चारशेहून अधिक ‘लटकूं’ना पुन्हा रस्त्यावर सक्रिय केले आहे. सध्या शिंगणापूर ते राहुरी व शिंगणापूर ते घोडेगाव मार्गावर मोटारसायकलवरील दोनशे ‘लटकू’ कार्यरत झाले. गावात रस्ता अडवून पूजासाहित्याची सक्ती सुरू झाली आहे. चक्क पोलिस ठाण्यासमोर हा प्रकार होत असताना, आठ दिवसांत एकही कारवाई झाली नाही, हे विशेष.

भाविकांच्या वाहनांचा पाठलाग व अडवणूक सुरू झाली असली, तरी लवकरच ‘लटकूं’चा बंदोबस्त केला जाईल. अधिक पोलिस कर्मचारी मिळाल्यानंतर दोन तपास नाकी व फिरती गस्त करणार आहे.
- सचिन बागूल, सहायक पोलिस निरीक्षक

राहुरी व सोनईपासून वाहनांचा पाठलाग केला जातो. पूजासाहित्याची सक्ती केली जाते. त्यांचे ऐकले नाही तर दमदाटी व शिवीगाळ केली जाते.
- रूपेशकुमार पटेल, बडोदा (गुजरात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT