zp nagar 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेला गळती 

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील दालनातील व स्वच्छतागृहातील पाणी दुसऱ्या मजल्यावरून झिरपू लागल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. ही गळती रोखण्यात यावी, याबाबत बांधकाम विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर बांधकाम विभागाने कार्यवाही करून तूर्त पाणी रोखलेले असले तरी ही गळती नेमकी कोठून होत होती याचा उलगडा मात्र झालेला नाही. 

लॉकल बोर्डपासून असलेल्या ऐतिहासिक वास्तूत जिल्हा परिषदेच्या कारभार अनेक वर्ष चालला. जागा अपुरी पडू लागल्याने नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात आली. चार मजली नवीन वास्तू उभारून तिचे उदघाटन 12 ऑक्‍टोबर 2006 झाले. तेव्हापासून या इमारतीत आजतागायत जिल्हा परिषदेचा कारभार सुरू आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पाण्याची गळती दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबमध्ये होऊन ते पाणी ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या दालनासह पोर्चमध्ये होत असल्यामुळे या परिसरात नेहमीच पाण्याचे तळे साठत होते.

याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबतची व्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाकडे मांडली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने ही दुरुस्ती करावी, अशा सूचना दिल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरून होणारी पाण्याची गळती थांबविण्यात आलेली असली तरी नेमकी गळती कोठून होत होती, याचा उलगडा झालेला नाही. अनेक दिवस पाणी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबमध्ये पाणी झिरपल्यामुळे पाण्याचा पाझर अद्यापही कायम आहे. दुसऱ्या मजल्याच्या अनेक भागात पाण्याचा पाझर दिसून येत असून ओल कायम आहे. 
 
दुसऱ्या मजल्यावर पाण्याचा पाझर होत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला त्वरीत दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत बांधकाम विभागाने दुरूस्ती केली आहे. 
-वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन. 

लिकेज नेमके कोठे? 
तिसऱ्या मजल्यावरील पाणी लिकेज होऊन ते दुसऱ्या मजल्यावर येत आहे. पण तिसऱ्या मजल्यावरील दालनातील कुलरचे की स्वच्छतागृहातील पाणी लिकेज होत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. स्वच्छतागृहातील पाणी असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT