NCP Protest 
अहिल्यानगर

राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना-भाजपची युती; NCP युवानेत्याची पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

शिरुर कासार नगरपंचायतीत राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना भाजपकडून युती केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या युवानेत्याने केला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्टवरून आपल्या भावना मांडल्या आहेत. यात त्यांनी म्हटलं की, आज भाजपा सोबत अधिकृत गटात शिवसेना नगरसेवक गेले. (NCP youth wing leader alleges Mahebub Shaikh Facebook post)

त्यांच्या या भाजपा सोबत जाण्याने निवडणुकीच्या पूर्वीच असलेल्या छुप्या युतीचे कारस्थान जनतेच्या व पक्षनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या समोर उघड झाले आहे. यांच्या स्वार्थी छुप्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ जागा पाडण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Shirur NCP)

मेहबुब शेख यांनी म्हटलं की, पडद्यामागचे कारस्थान आज शिवसैनिकांच्या समोर उघडे पडले हे बरं झालं. कारण शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब हे भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी एकीकडे कष्ट घेत आहेत; तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील स्वार्थी नेते माज़ी मंत्री निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या माज़ी मंत्र्यासोबत छुपी युती करत होते. आज हेच अतिनिष्ठावंत लोक निकालाच्या नंतर उघड भाजपा सोबत जात नवा संसार थाटत आहेत असं म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी दोन माजी मंत्र्यांना एकत्रित यावे लागले. चोरी छुपी करत व सेनेचा विचार डावलून गद्दारी केली याचा विचार शिवसेना करेल काय हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाची आठवण शिवसेना 'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोथुर लावणाऱ्या' बीडच्या नेत्याला करुन देणार का ? हा यक्ष प्रश्न पडला असल्याचं मेहबुब शेख यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT