young boy esakaL
अहिल्यानगर

श्रीरामपूर ते थेट तामिळनाडू! 'तो' मुलगा अखेर सापडला

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तब्बल दीड वर्षापुर्वी तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय मुलगा अखेर वेल्लुपुरम (तामिळनाडु) येथे नुकताच सापडला आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात ६ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुमारे दीड वर्ष तालुका पोलिसांकडुन न लागल्याने पुढील तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार एस. बी. कांबळे यांनी त्याचा शोध घेतला.

दीड वर्षापुर्वी हरवलेला मुलगा तामिळनाडुमध्ये सापडला

तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक मसुद खान यांच्या सुचनेप्रमाणे राज्यातील विविध बालसुधारगृहे, सामजिक संस्था (NGO) यांच्याशी संपर्क साधुन पाठपुरावा केला. तसेच देशभरातील बाल कल्याण समिती व सामजिक संस्थांशी संपर्क साधण्याची विनंती केली. सदर बालकाबाबत वेळोवेळी नगर येथील बाल कल्याण समितीनी माहिती घेतली. तेव्हा बेपत्ता असलेला मुलगा वेल्लुपुरम (तामिळनाडु) येथील बाल कल्याण समिती मध्ये असल्याचे समोर आले. हा मुलगा बाल कल्याण समिती वेल्लुपुरम (तामिळनाडु) यांना मिळाल्याने त्यांनी त्याला नगर येथील बाल कल्याण समितीकडे नुकताच सुपूर्त केले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांनी बाल कल्याण समितीकडुन योग्य त्या पुर्ततेसह ताब्यात घेवुन पुढील तपास तालुका पोलिस ठाण्यात पुन्हा वर्ग केला.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष व बालकल्याण समितीची कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुद खान व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष तसेच बाल कल्याण समितीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPने ५ सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा घेतला मागे; सुप्रीम कोर्टाने विशेषाधिकार वापरत दिलेल्या आदेशानंतर मोठा निर्णय

Mumbai Indians च्या गोटातून ४ महत्त्वाच्या अपडेट्स! हार्दिक पांड्याचे कर्णधारपद गेल्यात जमा, पण...; रोहित शर्मा त्याचा माणूस बसवणार

Raju Shetti Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’; राजू शेट्टींचा पलटवार, शक्तीपीठ महामार्गावरून संघर्ष तीव्र

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद; ‘डॉक्टर, इंजिनिअर नको, पोलीस होणार!’

Marathi News Live Updates : उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार नाकारले

SCROLL FOR NEXT