Mumbai Crime crime
अहिल्यानगर

Nagar Crime: शाळकरी मुलीचा विनयभंग, पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार देताच आरोपी...

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात राहत होता.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर - शाळकरी मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अक्षय बंडू कुऱ्हाडे (वय २३, रा. अनसूय नगर, कल्याण रोड, ता. जि. नगर, मूळ रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार देताच आरोपी पसार झाला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीच्या शोधासाठी पाठविलेल्या पथकाने दोन दिवस शोध घेत त्याला पुणे येथून ताब्यात घेतले.

आरोपी पीडित ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अनेक दिवसांपासून पाठलाग करत होता. तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात राहत होता.

तो एका वाहनावर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच लोणीकंद येथून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीतल मुगडे, तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, संदीप थोरात, अमोल गाढे, याकूब सय्यद, सोमनाथ राऊत, नितीन शिंदे, रिंकी माढेकर, ज्योती काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT