The number of corona patients in Ahmednagar district has crossed 80 thousand 
अहिल्यानगर

बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात दिवसभरात 449 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने 80 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 80 हजार 429 झाली आहे. आतापर्यंत 1172 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या 2227 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
 
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 159, खासगी प्रयोगशाळेत 267, तर अँटीजेन चाचणीत 23 रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात सर्वाधिक 156, राहाता 47, कोपरगाव 45, संगमनेर व पारनेर प्रत्येकी 23, श्रीगोंदे 18, नगर तालुका व पाथर्डी प्रत्येकी 16, राहुरी व श्रीरामपूर प्रत्येकी 15, नेवासे 11, शेवगाव 9, जामखेड 6, अकोले 5, भिंगार 1 आणि इतर जिल्ह्यांतील 4 रुग्णांचा समावेश आहे.
 
नगर शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात राहाता व कोपरगाव तालुक्‍यांतील रुग्णसंख्या लक्षणीय वाढली आहे. संगमनेर तालुका कोरोनाबाबत सुरवातीपासूनच संवेदनशील राहिला आहे. या चारही ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा जास्त असल्याने प्रवाशांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्‍यात तुलनेने रुग्णवाढीचे प्रमाण कमी दिसते. श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी, नेवासे आणि नगर तालुक्‍यात रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढते आहे. कोरोनामुक्‍त झालेल्या 325 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 77 हजार 30 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.77 टक्के झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT