HIV positive google
अहिल्यानगर

अहमदनगर : सुशिक्षितांमध्येच ‘एचआयव्ही’चा टक्का वाढता

दौलत झावरे

नगर : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे राज्यात सर्वत्र एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे १९९८ पासून सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामार्फत राज्यभर रुग्णांची तपासणी, समुपदेशन, संदर्भसेवा व उपचार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या सुशिक्षितांमध्ये ‘एचआयव्ही’ बाधितांचे (HIV positive) प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. हेच प्रमाण मजूर व वाहनचालकांमध्ये मात्र नगण्य आहे.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे जिल्ह्यात ‘एचआयव्ही’ग्रस्तांची तपासणी, समुपदेशन, संदर्भसेवा व उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या असे १७ हजार ५०० रुग्ण आहेत. यामध्ये शून्य ते ९३ वर्षे वयाच्या रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयासह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार, तर २७ केंद्रांत ‘एचआयव्ही’संदर्भात समुपदेशन व चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयात सुमारे साडेसात हजार व लोणी येथील प्रवरा रुग्णालयात सुमारे साडेतीन हजार जण उपचार घेत असून, काही जण परजिल्ह्यांसह खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातर्फे जिल्ह्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत असली, तरी पुढारलेल्या नगर जिल्ह्यात ‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्णांचा आलेख वाढत असून, तो चिंताजनक आहे. यामध्ये सुशिक्षित वर्गाचा समावेश मोठा असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील २७ ‘एचआयव्ही’ समुपदेशन व चाचणी केंद्रे आणि दोन उपचार केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना चांगले समुपदेशन, एचआयव्ही तपासणी, संदर्भ सेवा, उपचार देण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या उद्दिष्टाला अनुसरून जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग कार्यरत आहे.

- शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

‘एचआयव्ही’संदर्भात जनजागृती चांगली होत आहे. प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. रुग्णांवर उपचार व समुपदेशनाचे काम आमच्याकडून सदैव सुरू आहे.

- डॉ. व्ही. एस. पानसंबळ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी

जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाचे काम जिल्ह्यात उत्कृष्टरीत्या सुरू आहे. कोरोना संकटात रुग्णांना औषधेही घरपोच वितरित करण्यात आली.

- डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक

आकडे काय सांगतात

जिल्ह्यात एकूण रुग्ण : १७ हजार ५००

रुग्णांचा वयोगट : शून्य ते ९३ वर्षांपर्यंत

एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केंद्रे : २७

उपचार केंद्रे : दोन

रुग्णांची स्टेज व येणारा खर्च

पहिला टप्पा : एक हजार

दुसरा टप्पा : तीन हजार

तिसरा टप्पा : दहा हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT