jwari sakal
अहिल्यानगर

नेवासे : सुगीत चालेना गोफण, ज्वारीला प्लॅस्टिकचे ‘झाकण’

पक्ष्यांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शोधला जुगाड

सुनील गर्जे

नेवासे : रब्बी हंगामातील ज्वारी आता हुरड्यात आली आहे. या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांकडून ज्वारीच्या कणसांना प्लॅस्टिक पिशव्यांचे आवरण घातले जात आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा जुगाड शोधून काढला आहे.

तालुक्यात ज्वारीचे पीक ठरावीक भागात व कमी प्रमाणात घेतले जात असल्याने, पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यावर तुटून पडतात. प्लॅस्टिक पिशव्यांद्वारे पिकाचा बचाव केला जात आहे. पूर्वी गोफण फिरवून पक्ष्यांना पिटाळून लावले जायचे. काही जण बुजगावणी उभी करून पक्ष्यांना घाबरवत. काही जण फटाके वाजवीत. हल्लीच्या डिजिटल युगात गावोगावचे शेतकरी स्मार्ट जुगाड शोधत आहेत.

कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांकडून ज्वारीचे पीक घेतले जाते. फेब्रुवारी- मार्चमध्ये ते काढणीला येते. या सुगीच्या हंगामात धान्य खाण्यासाठी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे पिकांवर बसतात. त्यामुळे पक्ष्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे फंडे वापरले जातात.

पक्ष्यांना ज्वारीचे दाणे दिसत असले, तरी प्रत्यक्षात खाता येत नसल्याने, तसेच प्लॅस्टिक उन्हामुळे चमकत असल्यामुळे, शेतात कोणीतरी असल्याचा भास पक्ष्यांना होत आहे. यामुळे धान्याची होणारी नासाडी टळते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेवासे तालुक्यात शेतकऱ्यांचा ओढा ऊस, कांदा, हरभरा, गहू या पिकांसह फळबागांकडे मोठ्या प्रमाणात असल्याने, ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. तालुक्यात गेल्या सहा-सात वर्षांत नऊ-दहा हजार हेक्टर असलेले ज्वारीचे क्षेत्र यंदा फक्त बाराशे हेक्टरवर आले आहे.

- दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे

पूर्वी सुगीच्या काळामध्ये काढणीयोग्य ज्वारीचे पक्ष्यांपासून रक्षण गोफण-धोंडा पद्धतीने करण्यात येत होते. तसेच, विचित्र आवाज काढले जात. आता शेतामध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने असे प्रयोग केले जातात.

- संजय काकडे, प्रगतिशील शेतकरी, नारायणवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT