PM Modi In Shirdi Esakal
अहिल्यानगर

PM Modi In Shirdi: शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल: शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं?

कार्तिक पुजारी

अहमदनगर- विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल त्यांनी केला आहे. ( PM Modi In Shirdi criticize ncp chief sharad pawar on farmer issue)

काही लोकांनी, महाराष्ट्राच्या वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेला नेता. व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी गेल्या ६० वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

60 वर्षांच्या कार्यकाळात शरद पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. दुसरीकडे आमच्या सरकारने सात वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. २०१४ च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ५०० ते ६०० कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, असं ते म्हणाले.

शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना पैशासाठी दलालांवर अवलंबून राहावं लागायचं, त्यांना महिनो-महिनो पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रब्बी पिंकासाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे, असं मोदी म्हणले.

महाराष्ट्रामध्ये खूप शक्ती आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. राज्यामध्ये अनेक विकासकामे सुरु झाले आहेत. अनेक विकास कामे पूर्ण झाले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ट्रान्सपोर्ट सेवेसंबंधी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. भारताला आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे, असं मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT