Crime Google
अहिल्यानगर

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी; तिघांविरोधात गुन्हा

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : ॲट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Case) दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आज (गुरुवारी) दुपारी चार वाजता राहुरी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

खडांबे खुर्द येथे ३१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, विनायक राजेंद्र गर्जे (दोघेही रा. खडांबे खुर्द) व बापू रोहिदास ससाने (रा. गुंजाळे) यांच्यासमवेत आरोपींचे भांडण झाले. आरोपीच्या कुटुंबातील एका महिलेचे गावातील दोन जणांशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा करून, समाजात बदनामी केल्याचा आरोप आरोपींनी केला. त्यावरून भांडण विकोपाला गेले. आरोपींनी राहुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. तर त्यांनी हरिश्चंद्रे, गर्जे व ससाने काम करीत असलेल्या ट्रॅक्टर मालक भगवान गोवर्धन कल्हापुरे (रा. खडांबे खुर्द) यांच्या मोबाईलवर फोन करून, तिघांनी समाजात आमची बदनामी केली. त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून, त्यांना जेलमध्ये पाठवू. अशी धमकी दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ट्रॅक्टर मालक कल्हापुरे यांनी "त्यांची एवढे पैसे देण्याची आर्थिक परिस्थिती नाही." असे सांगितल्यावर "त्यांनी दोन एकर जमीन विकून आम्हाला पैसे द्यावेत." अशी आरोपींनी मागणी केली.

दिनेश बाळासाहेब सगळगीळे, अनिता दिनेश सगळगीळे, प्रतिभा बाळासाहेब सगळगीळे (सर्वजण रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे (वय २४, धंदा - ट्रॅक्टर चालक) यांच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT