The price of onion at Rahata is seven hundred 
अहिल्यानगर

राहात्यात कांद्याला हजाराचा भाव, पाच दिवस होणार लिलाव

सकाळ वृत्तसेवा

राहात ः बाजार समितीच्या मोंढ्यावर आज साडेतीन हजार कांदागोण्या, तसेच दीड हजार डाळिंब कॅरेटची आवक झाली. उत्तम प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते एक हजार रुपये, उत्तम प्रतीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 100 ते 150 रुपये भाव मिळाला. सोमवार ते शुक्रवार, असे आठवड्यातून पाच दिवस कांदा, डाळिंब व भुसार मालाचे लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे, अशी माहिती सभापती बापूसाहेब आहेर यांनी दिली.

उपसभापती वाल्मीक गोर्डे, सचिव उद्धव देवकर व संचालक उपस्थित होते. आहेर म्हणाले, की आज दुय्यम प्रतीच्या कांद्याला 300 ते 600 रुपये, गोल्टी कांद्याला 550 ते 650 रुपये, तर जोडकांद्यास 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मध्यम प्रतीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 50 ते 90, तर दुय्यम प्रतीच्या डाळिंबाला 26 ते 50 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. 

मोंढ्यावर यापूर्वी गर्दी झाल्याने, तसेच भाजीपाला खरेदी-विक्री करणारी महिला कोरोनाबाधित आढळल्याने शेतमालाचे लिलाव तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांची अडचण व मागणी लक्षात घेऊन, संस्थेचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेऊन लिलाव सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. 

भाजीपाल्याचे लिलाव मात्र बंदच 
सोशल डिस्टन्सिंगचे पालन व मास्क लावल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. प्रत्येक वाहन व व्यक्तीची नोंद केली जाते. सॅनिटायझरची ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. कांद्याची आवक पहाटे पाच ते सकाळी 11, तसेच डाळिंबाची आवक पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि भुसार मालाची आवक सकाळी दहा ते दुपारी एक, या वेळेतच स्वीकारली जाईल. भाजीपाल्याचे लिलाव मात्र बंद ठेवले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

VIRAT ROHIT NEXT MATCH: ३ वनडे झाले, आता थेट ५ सामन्यांचा धडाका! विराट कोहली-रोहित शर्मा पुन्हा कधी दिसणार? तारीख अन् ठिकाण आलं समोर

SCROLL FOR NEXT