The banks meeting will be held online this year as the number of corona is increasing.jpg 
अहिल्यानगर

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर; प्राथमिक शिक्षक बॅंक पदाधिकाऱ्यांची आठ एप्रिलला होणार निवड

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 27) सत्ताधारी संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामे सादर केले होते. हे राजीनामे आज मंजूर करण्यात आले. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची आठ एप्रिलला निवड होणार आहे.
 
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची सर्वसाधारण सभा रविवारी (ता. 28) बॅंकेच्या सभागृहात ऑनलाइन झाली. या सभेत नेहमीप्रमाणे विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे या सभेलाही गालबोट लागले आहे. या सभेच्या अगोदर बॅंकेत संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सभेच्या नियोजनाबरोबर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामे सादर केले होते. गुरुमाऊली मंडळाच्या कोअर कमिटीने ते मंगळवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर केले. हे दोन्ही राजीनामे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मंजूर करत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड आठ एप्रिलला आहे. यामध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT