crime news Kidnaped girl Sakal
अहिल्यानगर

15 दिवसांत 8 अल्पवयीन मुली राहत्या घरातून गायब; हळद लागलेली नवरीसुद्धा नेली होती पळवून | Rahuri News

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या दोन घटनेत सादिक शेख आणि फारूख शेख या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुरी : तालुक्यात अल्पवयीन मुली गायब होण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. मागील आठवड्यात सहा मुली गायब झाल्याचे प्रकार घडले. पुन्हा मागील दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत एकूण आठ प्रकार झाल्याने पालकांचे टेन्शन वाढले आहे.

रविवारी (ता. ७) पहाटे दोन वाजता १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून गायब झाली. नातेवाइकांच्या तक्रारीवरून अज्ञात तरुणाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत सोमवारी (ता. ८) पहाटे पाच वाजता १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून गायब झाली. याही घटनेत पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मागील आठवड्यातील दोन मुलींच्या अपहरण प्रकरणाचा राहुरी पोलिसांनी छडा लावला. पहिल्या प्रकरणात सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी फारुक हारून शेख (वय २२) याला अकोले (जि. अहमदनगर) येथे बसस्थानकात अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. मुलीला तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी शेख व त्याला मदत करणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेतील आरोपी सादिक सलीम शेख (वय २२) याने हळद लागलेली नवरीच लग्नाच्या दिवशी पहाटे मंगल कार्यालयातून पळवून नेली होती. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांसह पाचशे वऱ्हाडी राहुरी पोलिस ठाण्यात धडकले. तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील, चालक लक्ष्मण बोडखे, सुशांत दिवटे यांच्या पथकाने दिवसरात्र शोधमोहीम राबविली. मुलीला टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे एका रुग्णालयात लपवून आरोपी फरार झाला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सादिक शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

Viral Video : भर लग्नात मर्डरचा थरार! प्रियकराने वरमालावेळी नवरीवर झाडल्या गोळ्या; नवरदेव बघतच राहिला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

SCROLL FOR NEXT