Ram Shinde's recommendation for Rajendra Phalke 
अहिल्यानगर

राष्ट्रवादीच्या फाळकेंच्या आमदारकीसाठी भाजपच्या माजी मंत्र्यांची शिफारस, रदबदलीची चर्चा

नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाण्याला आता राजकीय रंग चढला आहे. कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. कोरोना महामारीतही त्यांनी हे आंदोलन छेडले. आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी ताशेरे अोढले आहेत. दुपारी आंदोलन मागे घेतले असले तरी त्यांनी या आंदोलनातून त्यांनी दोन पक्षी मारले आहेत.

आंदोलनस्थळी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधीपुढे त्यांनी आमदार पवार यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मतदारसंघाकडे कसे दुर्लक्ष आहे, असा दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता. आमदार भेटत नाहीत, लोकांच्या तशा तक्रारी आहेत. आम्ही आमदार आणि मंत्री असताना चोवीस तास लोकसेवेसाठी उपलब्ध होतो. परंतु विद्यमान आमदार चक्कर मारून गेले की गेले. लोकांचे किरकोळ किरकोळ प्रश्न असतात, त्यांनी ते मांडायचे कुठे, कारण अधिकारी त्यांना जुमानत नाहीत. आणि आमदारांना सांगायची सोय नाही, अशी मतदारसंघात स्थिती आहे, असेही ते पत्रकारांना सांगत होते.

विद्यमान आमदार जर उपलब्ध होत नसतील तर राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घ्यावे, त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाला आणखी एक आमदार मिळेल. राष्ट्रवादीने फाळके यांना उमेदवारी दिल्यास त्याचे स्वागत करू, माजी मंत्री राम शिंदे यांनी अशी शिफारस केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांनी फाळके यांची रदबदली का केली, असावी, याची चर्चा सुरू आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, फाळके यांनी त्यांच्या पक्षासाठी माझ्याविरुद्ध दोनवेळा उमेदवारी केली. तसेच विद्यमान आमदार भेटत नाहीत अशी मतदार संघातील अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजेंद्र फाळके यांना संधी दिल्यास स्थानिक असल्याने ते सहज सर्वांना उपलब्ध होतील. या विधानामुळे कर्जत-जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या विधानाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT