Photo Viral Sakal
अहिल्यानगर

Rohit Pawar : मिरज शासकीय रूग्णालयातील खाटांवर कुत्रे काढतायेत झोपा! रोहित पवारांनी शेअर केले फोटो

ही योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असाही टोला त्यांनी तानाजी सावंत यांना लावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिरज : मिरज येथील शासकीय रूग्णालयातील खाटांवर चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं असून आमदार रोहित पवार यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रात आरोग्यविभागाच्या योजनांची जाहिरात दिल्यावरूनही त्यांनी निशाणा साधत सवाल केला आहे.

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रूग्णालयातील रूग्णांना उपचार घेण्यासाठी ठेवलेल्या खाटांवर चक्क तीन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी हे फोटो पाठवले असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय म्हणाले आमदार रोहित पवार?

"एका कार्यकर्त्याने पाठवलेला मिरज शासकीय रुग्णालयाचा हा फोटो आहे. येथे कदाचित माणसांसोबत पाळीव प्राण्यांचा पण उपचार केला जात असावा. ही अभिनव योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असतील. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, शासनाने केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवे."

"स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत पण माझ्या मतदारसंघात ४०% काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी पैसे नाहीत. अशा गलथान कारभाराला आता #THE_RISE_OF_HEALTHY_MAHARASHTRA म्हणायचे का?" अशी सणसणीत पोस्ट करत पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या कामावर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT