rohit pawar esakal
अहिल्यानगर

नारायण राणे हे मोठे नेते; रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया

शेख सत्तार

अरणगाव (जि.अहमदनगर) : भाजप व महाविकास आघाडीच्या (BJP & mahavikas aghadi) मोठ्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) प्रकरणावर आपापली भूमिका मांडली आहे. स्वतः राणे मोठे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराचे वक्तव्य त्या ठिकाणी होणे योग्य ठरणार नाही. मोठे नेते बोलत असतील, तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी (ता.२५) अरणगावमध्ये ‘सकाळ’शी बोलताना दिली.

आमदार रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राणे यांच्यावर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी राणे यांना अटक केली. यावरून राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला होता. दरम्यान, आमदार पवार जामखेड तालुक्यातील अरणगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राणे प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

यावेळी आमदार पवार यांनी, मोठे नेते बोलत असतील, तर मी त्याच्यावर जास्त काही बोलू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया देत राणे प्रकरणावर भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, की तोडफोड होत असताना सर्वसामान्य लोकांना त्रास होता कामा नये. सरकारच्या मालमत्तेचे नुकसान होता कामा नये, ही काळजी दोन्ही बाजूने घेणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT