file photo sakal
अहिल्यानगर

संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : राहत्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या बालिकेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्ष सात महिने वयाच्या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील साकुर मळा परिसरात घडली. शिवांगी संतोष वाकचौरे असे तिचे नाव आहे. शेतातील वस्तीवरील घरासमोरच्या अंगणात शिवांगी खेळत होती. तर तिचे आई वडील शेजारच्या शेतात मका काढीत होते. भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. (AhamadNagar News)

त्यावेळी जवळच काम करणाऱ्या तिच्या आई-वडीलानी हा प्रकार पाहून बिबट्याला हुसकण्यासाठी जोरात आरडा ओरड करीत मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. जखमी शिवांगीला तातडीने संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिचे निधन झाल्याचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील प्रवरा काठच्या परिसरात सुरक्षित अधीवासामुळे गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली असून, मानवी जीविताला धोका होऊ लागल्याने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सरपंच रोहिदास खताळ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT