nagar sakal
अहिल्यानगर

संगमनेर : STP प्लँट स्थलांतरासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

संगमनेर येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : नगरपालिकेच्या एसटीपी प्लँटची जागा स्थलांतरित करावी, या मागणीसाठी शहरातील हजारो नागरिकांनी आज दुपारी प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून विरोध दर्शविला. या वेळी झालेल्या सभेत अनेकांनी याबाबतच्या भावना व्यक्त केल्या.

याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिले. संगमनेर शहरातील प्रदूषित सांडपाणी थेट प्रवरा नदीपात्रात मिसळल्याने, स्थानिक, तसेच नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल होत्या. राजकीय हस्तक्षेपही झाल्याने, हा प्रश्न चिघळला होता. त्यामुळे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरणासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली. यासाठी शहरातील भूमिगत गटारांची कामेही सुरू आहेत.

प्लँटसाठी जोर्वे नाक्याजवळील पालिकेच्या मालकीच्या दोन एकर भूखंडाची जागा निश्चित केली. त्यावरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविल्यानंतर या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध सुरू झाला. आज मुस्लिम समाजातील महिलांसह हजारो नागरिकांनी तिरंगा व काळे झेंडे घेऊन मूक मोर्चा काढला. प्रांताधिकारी कार्यालयासमोर त्याचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी डॉ. अमोल कर्पे, ॲड. श्रीराम गणपुले, मुजीब शेख, शौकत जहागीरदार, इसहाकखान पठाण, आयूब शेख, अजीज ओहरा, शाकीब शेख, जमीर शेख, गौस सय्यद, फिरोज पठाण, तनीष मिर्झा, अमर कतारी, नजीर शेख, बानोबी पठाण, संजय भालेराव आदींची भाषणे झाली.

जोर्वे नाका येथील प्रस्तावित जागेवर महिलांसाठी जॉगिंग पार्क, मुलांसाठी बागेचा ठराव होता. मात्र, संबंधित नगरसेवकांच्या सह्या घेऊन परस्पर संमती घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मुस्लिम समाजाकडून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने व शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला होता. स्वयंसेवकांनी मोर्चाच्या शिस्तबद्धतेसाठी मोठे प्रयत्न केले.

आम्ही आजवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या म्हणण्यानुसार मतदान केले. या प्लँटची जागा न बदलल्यास आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत धडा शिकवू.

- शफी बेपारी, नागरिक, संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT