sanjay raut esakal
अहिल्यानगर

"मी पुन्हा येईन, ही डरकाळी आता ‘लांडगा आला रे लांडगा' सारखीच

चंद्रकांत दरंदले

सोनई (जि.अहमदनगर) : ‘‘मी पुन्हा येईन, ही डरकाळी आता ‘लांडगा आला रे लांडगा आला’प्रमाणे झाली आहे. भाजपने राजकारणाच्या भिंतीवर कितीही डोके आपटले, तरी महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi) पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच,’’ असा विश्वास खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केला. येथील (ता.३१) आमराई विश्रामगृहात झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. (sanjay-raut-critised-bjp-marathi-news-jpd93)

नगर जिल्ह्याची ओळख ‘साखरसम्राटांचा जिल्हा’

आज नगर जिल्ह्याची ओळख ‘साखरसम्राटांचा जिल्हा’ म्हणून आहे. यापुढे ‘शिवसेनेचा जिल्हा’ म्हणून ओळख होण्यासाठी मंत्री गडाखांनी जोर लावावा, असे सांगून राऊत म्हणाले, ‘‘शिवसेना हा वाघाचा पक्ष म्हणून जन्माला आला असल्याने, प्रत्येक काम आणि भूमिका वाघासारखीच राहणार आहे. सत्ता आली असली तरी पक्षवाढ आणि सामाजिक कार्य सुरू ठेवण्यास अग्रक्रम द्या.’’ सचिव मिलिंद नार्वेकर व खासदार राऊत मुख्यमंत्री ठाकरे यांचे कान आणि डोळा असून, जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी या दोघांनी जिल्हा दत्तक घ्यावा, असे मंत्री गडाख यांनी सांगितले. यावेळी खासदार लोखंडे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंसह पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्‍घाटन

शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने साकारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्‍घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर उपस्थित होते. यावेळी दीपक फर्टिलायझरचे प्रमुख नरेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT