Share Market Fraud Sakal
अहिल्यानगर

Share Market Fraud: शेअर ट्रेडिंगमध्ये पुन्हा फसवणूक सेमिनार घेत अनेकांना गंडा; चौघांविरूद्ध गुन्हा

Stock market scam: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चौघांच्या टोळीने शहरात सेमिनार घेत अनेकांची फसवणूक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चौघांच्या टोळीने शहरात सेमिनार घेत अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संदीप बाबूराव कोठुळे (रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्री शिवाजीनगर, राहुरी) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चौघांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एच. आर. श्रीकांत, धर्मेंद्रसिंग सेगर (दोघे रा. भोपाळ, मध्य प्रदेश), दिनेश योगेश भटनागर (रा. पिंपळे निलख, पुणे), साजिद शेख (रा. कोंढवा, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमध्ये अनेकांची फसवणूक केली आहे.

विशेष म्हणजे आरोपींनी शहरात सेमिनार देखील आयोजित केले होते. त्यातून त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन केला. नंतर लाखो रूपये वसुल करून पुणे येथे सुरू केलेले कार्यालय बंद करून पोबारा केला.

फिर्यादी कोठुळे यांनी आरोपींना वेळोवेळी ऑनलाईन सुमारे ११ लाख २० हजार रूपये दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोठुळे यांच्याप्रमाणेच इतर गुंतवणूकदारांनी लाखो रूपये गुंतविले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही आरोपींकडून नफा तर दूरच गुंतवलेले पैसे देखील मिळाले नाहीत.

पुणे येथे सुरू केलेले कार्यालय देखील बंद केले. कोठुळे यांच्यासह सर्व गुंतवणुकदारांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

एक कोटीची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तीन गुन्हे आठवडाभरात दाखल झाले आहेत. शहरातील व्यावसायिक राजीव अनंत सहस्त्रबुद्धे (वय ५३, रा.सिद्धीविनायक सोसायटी, सावेडी) यांची १५ लाख ५५ हजारांची फसवणूक झाली.

तसेच प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा.शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी) यांची देखील ६६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. आता फसवणूक करणारे आणखी एक रॅकेट समोर आले आहे. या तीन गुन्ह्यात सुमारे एक कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

फसवणुकीचे नवनवीन प्रकार

अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत शेवगाव येथे अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी रास्तारोको आंदोलने देखील केली. काहींना अटक केली. परंतू, मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यात शेअर ट्रेडिंगमधील फसवणुकीचे दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT