Shirapur Gram Panchayat, Society election unopposed 
अहिल्यानगर

शिरापूर ग्रामपंचायत, सोसायटीची निवडणूकच होत नाही, कायम बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

निघोज ः राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होत असताना पारनेर तालुक्यातील शिरापुर गावची ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वधन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग सहा वेळा गावातील ग्रामपंचायत व.सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध करुन शिरापुर ग्रामस्थांनी राज्यात विक्रम केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा अन् गावाला पंचवीस लाखांचा निधी घ्या, असे जाहीर करुन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला .त्यामुळे पारनेर तालुक्यात आज अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध निवडीच्या मार्गावर असताना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वधन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिरापूर येथे आज (सोमवारी) ग्रामस्थांची बैठक पार पडली.

या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मधुकर उचाळे यांनी ग्रामस्थासमोर मांडला असता ग्रामस्थांनीही बिनविरोध निवडीला एकमताने पाठिंबा दर्शविला.

ग्रामपंचायतसाठी बिनविरोध निवडीसाठी ठरलेले  सदस्य -

रखमा बाबुराव उचाळे,हनुमंत शंकर भोसले, संतोष पांडुरंग नरसाळे ,अस्मिता मधुकर उचाळे, जान्हवी भास्कर उचाळे, जयश्री सोमनाथ वडणे, लीलाबाई पांडुरंग शिनारे, किरण सचिन खामकर ,कैलास पोपट उचाळे, ललिता नवनाथ चाटे. शिरापूर सेवा

सोसायटीसाठी बिनविरोध ठरलेले सदस्य
सचिन श्रीराम शिनारे, दत्तात्रय गेनभाऊ नरसाळे, गोविंद साहेबराव चाटे, संदीप तुकाराम खाडे, शिवाजी श्रीपती दाते, शहाजी नाथु उचाळे, संतोष तुकाराम गुंजाळ, मच्छिंन्द्र खंडू उचाळे, ज्ञानेश्वर रामदास साळवे, उषा मारुती गाडगे, सोमनाथ शंकर उचाळे, पांडुरंग रुमजी वडणे, संतोष दाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : जय प्रकाश गांधी यांना 'भारतमला महामार्ग भूसंपादन नुकसानभरपाई घोटाळा' प्रकरणात अटक

SCROLL FOR NEXT