Milk sakal
अहिल्यानगर

Milk Producer : दूध उत्पादकांवर उपासमारीची वेळ

दुधाचे दर उतरल्याने व पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चंद्रभान झरेकर

जेऊर - पावसाने तालुक्यात चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. सुका चारा भिजला तर शेतातील उभा चारा भुईसपाट झाला. त्यातच दुधाचे दर उतरल्याने व पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पशुखाद्याचे वाढलेले दर, चारा टंचाई, पाणी टंचाई त्यातच दुधाला बाजार कमी झाल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

२९ रुपयांपर्यंत पोचलेले दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयापर्यंत मागे आले आहे. नोकऱ्या नसल्यामुळे अनेक तरुण कर्ज काढून या व्यवसायात नव्याने उतरले आहेत. उत्पन्नाचे दुसरे काही साधन नसल्यामुळे तेही आता कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच पशुधनाच्या किमतीही वाढल्यामुळे नवीन तरुण या व्यवसायात उतरण्यास धजावत नाहीत.

दुष्काळी परिस्थितीत शेतीला आधार देणारा जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले होते. जनावरांची खरेदी, गोठा बांधणी व इतर गोष्टींसाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. आता शासनाच्या अनास्थ्येमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दुधाला लिटरमागे जवळपास सात ते आठ रुपयांनी अचानक झालेली घट शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली. राज्यातील सहकारी संघ व खाजगी प्रकल्पांचे मालक यांनी दुधाचे दर कमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान डोंगरगण, पिंपळगाव माळवी, जेऊर, शेंडी, पोखर्डी, वडगाव गुप्तासह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठविण्याचे नियोजन केले आहे. पत्राला मुख्यमंत्र्यांचे उत्तर न आल्यास चारही गाव बंद ठेवण्याचा व गाई म्हशींना रस्त्यावर आणून रस्ता बंद करण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला. दुधाला हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.

राज्य शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. पशुखाद्य चारा, पाणी व इतर गोष्टींमुळे दूध उत्पादक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने दुधाचे भाव स्थीर ठेवल्यास अनेक तरुण या व्यवसायाकडे वळतील व रोजगाराचा प्रश्नही सुटेल.

- दशरथ कराळे, दूध उत्पादक पोखर्डी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT