Gudipadvafestival Sugarcane harvesters images
अहिल्यानगर

ऊसतोडणी कामगारांनी उभारली कष्टाची गुढी

आज सकाळी मुळा कारखाना गट परिसरात भेट दिली असता ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात मोठा आनंदाचा सोहळा पाहण्यास मिळाला

सुस्मिता वडतिले

सोनई (अहमदनगर) : ऊन, वारा, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा कुठलाही विचार न करता पत्करलेलं कष्ट करत आलो. या कष्टातही आनंद मानून ऊसतोडणी कामगारांनी मोठ्या आनंदात गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला.

आज सकाळी मुळा कारखाना गट परिसरात भेट दिली असता ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात मोठा आनंदाचा सोहळा पाहण्यास मिळाला. आपआपल्या पाचराटाच्या झोपडीसमोर महिला व लहान मुली सडारांगोळी करताना दिसल्या. चिमुकले घराच्या परिसरात स्वच्छता करत होते. लहान मोठ्यांची सुरु असलेली लगबग कौतुकास्पद होती.

रोज पहाटे ऊसतोडणीसाठी दहा ते पंधरा किमी जावे लागते. ऊसाने भरलेली बैलगाडी घेवून कारखान्याकडे येताना हा सारा प्रवास कडक उन्हात होतो. कष्ट आणि उन्हातील प्रवासामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग अजून तरी झालेला नाही, असे नागेश गर्जे यांनी सांगितले. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी कामगार महत्वाचा दुवा असल्याने मुळा कारखान्याच्या वतीने सर्वांची विशेष काळजी घेतली जाते.

आज अनेक ऊसतोडणी कामगारांनी सणाची सुट्टी घेत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला. घरी गोडधोड जेवण करुन मराठी नववर्षानिमित थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेतले. गळीत हंगामनिमित्त सहा ते सात महिने राबणारे आमचे हात घरी गेल्यानंतरही थांबत नाही. घरच्या शेतात कष्टाचा दुसरा भाग सुरु होतो, असे दिनकर राठोड यांनी सांगितले.

बातमीदार - विनायक दरंदले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT